गावाविषयी माहिती
हिरवे-घाणवळ हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक प्रगतशील गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३१९९ आहे. गावामध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा हिरवे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा घाणवळ (स्थलांतरित गोंदे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ५, अंगणवाडी केंद्रे १० अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ६ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी,बंधारे व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नागली, उडीद व वरई ही प्रमुख पिके घेतली जातात. भात व वरई या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
हिरवे-घाणवळ ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. रोहयो अंतर्गत गावातीत्ल हद्दीतील शिवार रस्ते खडीकरण,मजबुतीकरण,तसेच वयक्तिक फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत .स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हिरवे-घाणवळ गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे त्यामुळे १२ महिने गावाला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होतो.
ग्रामपंचायत हिरवे-घाणवळ येथे सध्या लोकनियुक्त सरपंच श्री. हिरामण नारायण पाटील असून सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन गावाचा विकास घडवून आणतात त्यामुळे ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
हिरवे-घाणवळ गाव आज मोखाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.